PM Kisan New Registration 2023 : सर्वांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ, तात्काळ करा आपला अर्ज.

PM Kisan New Registration 2023 – शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे.पीएम किसान योजनेमध्ये जर आपलं नाव नसेल तर यापुढे आपण पीएम किसान योजनेमध्ये नाव नोंदणी करू शकता. यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे.

या शासन निर्णयाद्वारे आपण अर्ज कशा पद्धतीने करणार आहात व आपल्याला जर समस्या निर्माण झाली तर आपण कोठे मदत घेऊ शकता, याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला पी एम किसान सन्माननिधी योजने मध्ये कसं पात्र होता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल व या व्यतिरिक्त आपण पी एम किसान योजनेमध्ये पात्र झाल्याच्या नंतर cm किसान योजनेमध्ये देखील आपल्याला लाभ मिळणार आहे. तर यासाठी सर्व माहिती आपण जाणून घेऊया.

PM Kisan New Registration 2023

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात मान्यता दिलेली आहे. याबाबत शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीने अर्ज करता येणार आहे याबद्दलची माहिती या लेखामध्ये सादर केलेले आहे.

सर्वप्रथम अर्जदाराने काही जबाबदाऱ्या शासन निर्णयामध्ये सादर केलेले आहेत.त्या पाहुया

 • प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत अर्जदारांनी खालील प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.
 • केंद्र शासनाच्या पोर्टलवर अर्जदाराने स्वयं नोंदणी करणे गरजेचे आहे किंवा अर्जदार तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत किंवा सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे सीएससी पोर्टल वरती नोंदणी करू शकतो.
 • अर्जदाराला इ केवायसी करणे आवश्यक आहे
 • अर्जदाराला त्याच्या आधारक्रमांकशी बँक लिंक करणे आवश्यक आहे.
 • याव्यतिरिक्त शासन वेळोवेळी ज्या सूचना देईल त्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

फॉर्म भरताना अडचण आल्यास कोणाकडे जावे

शेतकरी बंधूंनो, यापुढे आपल्याला जर पी एम किसान योजनेमध्ये काही अडचण निर्माण झाले तर आपण कोणाकडे जावं आणि कोणाशी मदत मागावी याबद्दलची माहिती शासनाकडे उपलब्ध नव्हती किंवा कोणताच अधिकारी आपली योग्य अशी माहिती सादर करत नव्हता. परंतु आता शासनाने कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभाग यांना वेगवेगळ्या जबाबदारी निवडून दिलेले आहेत. आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी या तिन्ही विभागांमध्ये आपण जाऊन आपल्या समस्या दूर करू शकतात.

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • सात बारा आठ अ उतारा
 •  रेशन कार्ड
 • फेरफार
 •  मोबाईल
 •  ईमेल इत्यादी

पी एम किसान नोंदणी करण्याची कार्यपद्धती कशी आहे ही जाणून घेऊया

नवीन अर्जदाराची पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे, लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्राप्त करण्यासाठी खालील बाबी निश्चित करण्यात आले आहेत.

 • अर्जदार यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत नोंदणी करावी किंवा आपण सीएससी च्या माध्यमातून देखील अर्ज करू शकता.
 • पीएम पोर्टल वर नोंदणी केलेल्या तालुकास्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदाराची माहिती जमीन धरणाच्या पडताळणी करण्यासाठी तहसीलदार यांना तालुका कृषी अधिकारी पोर्टलवर उपलब्ध करून देतील.
 • यानंतर तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत आपले सर्व पडताळणी चेक केले जातील.
 • उदाहरणार्थ आपलं सातबारा आठ अ नोंदीचा फेरफार इत्यादी आवश्यक कागदपत्रे आपले चेक केल्याच्या नंतर सदर माहिती ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा कृषी विभाग यांच्यामार्फत सादर केले जाईल.
 • त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कार्यालयामार्फत लाभार्थ्याची सर्व माहिती योग्य आहे याची पडताळणी करेल आणि पडताळणी केल्याच्या नंतर सदर माहिती ही पुन्हा बरोबर असल्याचे खात्री जमा झाल्याच्या नंतर आयुक्त कृषी यांच्या स्तरावर ते राज्यस्तरीय लॉगिन मध्ये उपलब्ध झाल्यावर त्या ठिकाणी राज्यस्तरीय मान्यता देण्यात येईल आणि मंगच आपल्याला यामध्ये लाभ मिळणार आहे
 • एकंदरीत आपण जर फॉर्म भरला तर सर्वप्रथम फॉर्म भरण्याची पावती आपल्याकडे उपलब्ध असेल
 • त्यानंतर सर्व माहिती ही तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालय यांच्याकडून चेक केली जाईल
 • त्यांनी चेक केल्याच्या नंतर सर्व माहिती ही जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केली जाईल.
 • आणि त्यांच्याकडून मान्यता आल्यानंतर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळण्यास सुरू होईल.
 • याव्यतिरिक्त पीएम किसान योजनेचे पैसे चालू झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला सीएम किसान योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकतात.
 • या प्रक्रियेला सरासरी एक महिना दोन महिने तीन महिने किंवा अधिक कालावधी देखील लागू शकतो.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.

अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!