Shelipalan Yojana Maharashtra 2023 : 10 शेळ्यांसाठी मिळणार 100 टक्के अनुदान, तात्काळ करा अर्ज.

Shelipalan Yojana Maharashtra 2023 : शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पशुसंवर्धनाला चालना मिळावी व सर्वसामान्य जनतेला रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळे योजना राबवले जात असतात. तर यामधीलच एक योजना आहे ती म्हणजे शेळी पालन शेड अनुदान योजना. या योजनेमध्ये आपल्याला 35 ते 45 हजार रुपये एवढी रक्कम या योजनेमध्ये आपल्याला शासनाकडून मिळणार आहे.

दहा शेळी शेड बांधण्यासाठी हे अनुदान मिळणार आहे. तर आपल्याला याचा कशाप्रकारे लाभ घेता येणार आहे यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Shelipalan Yojana Maharashtra 2023

शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या शेळीपालन शेड अनुदान योजनेचा शंभर टक्के लाभ घेता येईल.

Shelipalan Yojana Maharashtra 2023

शेतकरी बंधूंनो शेळीला गरीबाची गाय म्हंटले जाते, म्हणजे शेळी गरीबाची गाय असते. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या वतीने गरीबातील गरीब शेतकऱ्याला किंवा मजुरी करणारे व्यक्तींना शेळीपालन योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेसाठी अनुदान आपल्याला राज्य सरकार व केंद्र सरकार या दोघांच्या संयुक्त विद्यमानेने आपल्याला यामध्ये मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे, हा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. Shelipalan Yojana Maharashtra 2023

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा आठ अ उतारा
  •  किंवा आपण घराचा आट अ उतारा सादर करू शकता
  •  दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्याचा दाखला
  •  जातीचा दाखला
  • अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  • महिला असल्यास यासाठी प्राधान्य राहील
  •  ग्रामपंचायत रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • ग्रामपंचायत शासकीय सेवेत नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र
  • जॉब कार्ड पत्र
  • फोटो व विहित नमुन्यातील अर्ज.

फॉर्म भरण्याचा प्रकार

Shelipalan Yojana Maharashtra 2023 याचा जर लाभ घ्यायचा असेल तर हा फॉर्म ऑनलाईन नसून ऑफलाइन स्वरूपामध्ये आपल्याला भरायचा आहे.

शेळीपालन योजनेसाठी अनुदान किती मिळणार ते पहा

शेतकरी बंधूंनो, शेळीपालन योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्या दहा शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे हे अनुदान रक्कम 35000 ते 45000 दरम्यान असणार आहे. या योजनेमध्ये शेळ्या घेण्यासाठी अनुदान मिळणार नसून आपल्याला शेळीपालन शेड बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. मिळालेल्या रकमेवरून आपल्याला शेळीपालन शेड बांधायचा आहे.

ही रक्कम माघारी करावी लागणार आहे का ते पहा

शेतकरी बंधूंनो, शेळीपालन शेड अनुदानासाठी आपण जर पात्र झाला तर मिळालेली रक्कम ही पूर्णपणे अनुदान असणार आहे म्हणजेच रक्कम शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला शंभर टक्के अनुदानावर ही रक्कम मिळणार आहे.

शेळीपालन शेड आकारमान कसा असावा

शेतकरी बंधूंनो शेळी पालन शेड यांच्यामध्ये पात्र झाल्यात नंतर आपल्याला सरासरी दहा शेळ्यान करता हे निवारा शेठ बांधायचा आहे. 7.50 चौरस मीटर एवढे शेड आवश्यक आहे. म्हणजेच आपण जर लांबी आणि रुंदी जर पाहिली तर आपल्याला सरासरी 3.75 मीटर लांबी असणे आवश्यक आहे व रुंदी ही दोन मीटर असणे आवश्यक आहे. भिंतीची उंची सरासरी 2.20 मीटर असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला 35 ते 45 हजार रुपये पर्यंत अनुदान यामध्ये आपल्याला मिळणार आहे.

ही योजना कोणामार्फत चालवली जाते

शेतकरी मित्रांनो ही योजना राज्य शासन व केंद्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने चालवले जात असून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी आपण अर्ज केला तर यामध्ये आपल्याला अनुदान हे मिळणार आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा

  • शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम या योजनेचा फॉर्म आपल्याला डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढायचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला वरील सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून त्यावरती ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांचा शिक्का घ्यायचा आहे.
  • त्यानंतर सदर फॉर्म घेऊन आपल्याला पंचायत समिती या ठिकाणी आपला फॉर्म सादर करायचा आहे.
  • जर आपण नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीमध्ये राहत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी जर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असा कश्य असेल त्या कक्षामध्ये जाऊन आपली सर्व कागदपत्रे व फॉर्म आपल्याला सादर करायचे आहे.
  • आवश्यक कागदपत्रे सादर केल्याच्या नंतर आपण सादर केलेल्या अर्जाला मंजुरी येते.
  • मंजुरी आल्यानंतर आपल्याला कार्यालयाकडून शेळीपालन शेड बांधणेसाठी सांगितले जाते.
  • त्यानंतर आपल्याला प्रशासकीय अधिकारी यांच्या नियमाप्रमाणे स्टेप टू स्टेप आपल्याला आपला गोटा शेड बांधायचा आहे.
  • त्यानंतर आपल्या सर्व कामाचं मस्टर काढून आपल्याला आपल्या व इतर कुटुंबातील व्यक्तींच्या म्हणजेच आपण मंजुरांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग केले जाते व त्यानंतर आपल्याला याचा लाभ मिळतो, अशी प्रक्रिया आपल्याला करणे आवश्यक आहे.

फॉर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!